तंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!

तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 

Updated: May 29, 2015, 06:23 PM IST
तंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'! title=

मुंबई : तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज ही घोषणा केलीय. ३१ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या 'वर्ल्ड नो टोबॅको डे' निमित्तानं बेस्ट बस गाड्यांवर तंबाखूविरोधी संदेश लावण्यात आलेत. या उपक्रमाचं उद्घाटन करताना, रावतेंनी हे सूतोवाच केलं. 

तंबाखूचं व्यसन करणाऱ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनाही रावतेंनी सल्ला दिलाय. 'जे मंत्री तंबाखू खातात, त्यांना आर. आर. पाटील जाताना टाटा करून गेलेत आणि माझ्या मागे येऊ नका' असं सांगितलंय, असा चिमटा रावतेंनी काढला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.