दुष्काळावरून राजकारण नाही - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत.. दुष्काळावरुन आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय.. 

Updated: Aug 16, 2015, 09:27 PM IST
दुष्काळावरून राजकारण नाही - शरद पवार  title=

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत.. दुष्काळावरुन आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय.. 

परभणीत आयोजित दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.. तसंच पाऊस पडला नाही यांत मागच्या सरकारचा दोष नाही किंवा भाजप सरकारचाही दोष नाही असंही पवार म्हणालेत.. 

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शेतक-यांना सरसकट मदत करण्याची मागणी पवारांनी केलीय.. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलंय.. कृषी खात्याचं नाव बदलून काय होणार असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना विचारलाय.. 

भेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!

शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत अशी स्तुतीसुमने पंकजा मुंडे यांनी उधळलीत.. तर पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत असा पलटवार पवारांनी केलाय... निमित्त होतं दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं.. 

या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, शिवराज पाटील हे राजकारणातले दिग्गज एकाच व्यासपीठावर आले.. यावेळी पंकजा यांनी विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.. याचवेळी बोलताना पंकजा यांनी शरद पवारांना दिलीपकुमार यांची उपमा दिली.. पवार आणि मुंडे यांच्यातल्या या राजकीय जुगलबंदीनं उपस्थितांना मात्र खळखळून हसवलं... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.