आणखी 2 दिवस कोरडेच, हवामान खात्याचा अंदाज

 राज्यात आणखी पुढील दोन दिवस पाऊस नसणार आहे, म्हणजेच पुढील दोन दिवस कोरडे जाणार आहेत, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

Updated: Jul 6, 2014, 12:28 PM IST
आणखी 2 दिवस कोरडेच, हवामान खात्याचा अंदाज title=

मुंबई : राज्यात आणखी पुढील दोन दिवस पाऊस नसणार आहे, म्हणजेच पुढील दोन दिवस कोरडे जाणार आहेत, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

अवघ्या महाराष्ट्राच्या जिवाला घोर लावणारा वरुण राजा अजूनही प्रसन्न होण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला, तरी अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. 

पुढील ‌दोन दिवसांसाठी हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामानखात्याने वर्तवला आहे. 

येत्या २४ तासांत कोकणात अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.

जुलै उजाडला तरीही पावसाची म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असूनही पाऊस मात्र, हुलकावणी देत आहे. 

येत्या ४८ तासांतही राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. गेले काही दिवस कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस लागत आहे. परंतु, मध्य महाराष्ट्र आण‌ि विदर्भ या परिसरात पावसाने दडी मारली आहे.

शनिवारीही कोकण सोडल्यास, राज्यभरात पावसाचे दर्शन झाले नाही. हवामाखात्याच्या अंदाजानुसार हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. 

गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत ११.२ मिमी पावसाची नोंद झाली; तर सांताक्रूझ भागात ३.४ मिमी पाऊस पडला. 

दुसरीकडे मुंबई आणि परिसरात पुढील २४ तासांत काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.