'कोयना'तील पाणी ३ टीएमसीने वाढले

जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी ३ टीएमसीने वाढले आहे.  सातारा जिल्ह्यात २ दिवसांत ३९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  सातारा जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात सध्या १०.६  टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

Updated: Jul 3, 2016, 03:15 PM IST
'कोयना'तील पाणी ३ टीएमसीने वाढले title=

सातारा : जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी ३ टीएमसीने वाढले आहे.  सातारा जिल्ह्यात २ दिवसांत ३९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  सातारा जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात सध्या १०.६  टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

महाबळेश्वरला १५५ मिलिमीटर, कोयना परिसरात १५६ मिलिमीटर पाऊस मागील २४ तासात  झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 

सततच्या पावसामुळे सातारा शहरानजीकच्या कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्‍वर घाटात दरड कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा रस्ता पर्यटकांसाठी खुला आहे. सातारा शहरातही पाण्याचा जोर वाढला आहे.