बारबालेची हत्या प्रकरणी एकाला हावडामधून अटक

 उल्हासनगर मधील आशेळे गावात  राहणा-या बारबालेची हत्या करून  तिचा मृतदेह  रेक्झीनच्या बॅगेत भरून तिचा पती पसार झाला होता. अखेर दोन दिवसांनी  विठ्ठलवाडी पोलीसानी नराधम पतीला कलकत्ता येथील हावडा पोलीस ठाणे येथुन अटक केली आहे.

Updated: Nov 23, 2016, 08:14 PM IST
बारबालेची हत्या  प्रकरणी एकाला हावडामधून अटक  title=

उल्हासनगर :  उल्हासनगर मधील आशेळे गावात  राहणा-या बारबालेची हत्या करून  तिचा मृतदेह  रेक्झीनच्या बॅगेत भरून तिचा पती पसार झाला होता. अखेर दोन दिवसांनी  विठ्ठलवाडी पोलीसानी नराधम पतीला कलकत्ता येथील हावडा पोलीस ठाणे येथुन अटक केली आहे.

  
जमिला खातुन उर्फ जमिला राजेश खान (24) असे त्या मृत महिलेचे नाव असून ती आशेळे गांवातील राजाराम कॉम्प्लेक्सच्या तिस-या मजल्यावर राहत होती.  तिन दिवसांपुर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दित जमिलाची हत्या करुन तिचा नवरा राजेशने पळून गेला होता . राजेशच्या मोबाईल टॉवरच्या माहितीमुळे तो कलकत्ता येथे घरी जात असल्याचे दिसुन आल्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस पथक विमानाने कलकत्ताला रवाना झाले होते. या पथकाने राजेश खान याला पहाटे चारच्या सुमारास हावडा प्लॅटफॉर्मवर उतरताच ताब्यात घेतले. 

राजेश खान हा विवाहित असून त्याची पत्नी आणि मुले हे मूळगावी असतात. तो अधूनमधून उल्हासनगरात येत होता. प्रियसी जमीला हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याने तो तिच्यासोबत पती सारखा राहत होता. पण जमीला ही बारमध्ये काम करित असल्याने त्याला आवडत नव्हते. त्यातून त्यांचे नेहमी खटके उडत होते. त्यातूनच त्याने झालेल्या भांडणात तिला ठोशाबुक्क्याने मारहाण करून तिचा गळा आवळून तिला ठार मरून तिचा मृतदे एका रेक्झीनच्या बॅगेत भरून  पळून गेला होता अशी कबुली राजेशने दिली आहे. राजेश खानला बुधवारी न्यायालयात हजर करणार आहेत.