तालुका कृषी अधिकाऱ्याला मारहाण, आरोपी मोकाट

अमळनेर तालुक्याचे कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांना एका तरूणाने मारहाण केली आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी मोकाट आहे.

Updated: Jul 29, 2014, 01:50 PM IST
तालुका कृषी अधिकाऱ्याला मारहाण, आरोपी मोकाट title=

जळगाव : अमळनेर तालुक्याचे कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांना एका तरूणाने मारहाण केली आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी मोकाट आहे.

या प्रकरणात अमळनेर पोलिसांनी बोट चेपे धोरण स्वीकारल्याची तालुक्यात चर्चा आहे. म्हणूनच आरोपी मोकाट असल्याच सांगण्यात येतंय. या आरोपीवर यापूर्वीही काही गुन्हे आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आरोपींनी कार्यालयातही तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. तालुक्यात अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली आहे. शेतकऱ्यांनीही विविध स्तरावर या घटनेचा निषेध केला आहे.

तालुका कृषी अधिकारी मागील पाच दिवसांपासून ट्रेनिंगसाठी हैदराबादेत होते. सोमवारी ते कृषी कार्यालयात आल्यानंतर त्यांना आरोपीने थेट कार्यालयात येऊन मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.

तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या पंचनाम्याचं काम कृषी विभागाकडून सुरू आहे. यात कृषी अधिकाऱ्यांची गाडी ही निव़डणुकीच्या कामासाठी तहसिलदारांना देण्यात आली आहे. तरीही मोटारसायकलीने मिटिंग आणि शेतांमध्ये जाऊन पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने, सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय.

आरोपीने शांत सुस्वभावी अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतरही, आरोपीला अभय देण्यासाठी अनेकांनी पोलिसांकडे छुपं लॉबिंग सुरू केल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.