रायगड पोलीस ऑनलाईन, थेट करु शकता ऑनलाईन तक्रार

रायगड पोलिसांनी नवीन वर्षाचे स्वागत आपला संकल्प प्रत्यक्षात आणत केलाय. रायगड पोलीस विभाग आता ऑनलाईन झालाय.

Updated: Jan 1, 2016, 08:31 PM IST
रायगड पोलीस ऑनलाईन, थेट करु शकता  ऑनलाईन तक्रार title=

अलिबाग : रायगड पोलिसांनी नवीन वर्षाचे स्वागत आपला संकल्प प्रत्यक्षात आणत केलाय. रायगड पोलीस विभाग आता ऑनलाईन झालाय.
यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार ऑनलाईन नोंदवून घेण्यात येईल. 

विशेष म्हणजे तक्रारीची प्रत तुमच्या इमेल आयडी किंवा व्हॉट्सअॅपवर मिळू शकणार आहे. क्राईम क्रिमीनल ट्रॅकींग सिस्टीम प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व २७ पोलीस ठाणी तसेच पोलीस खात्याशी संबंधित सर्व कार्यालये ऑनलाईन करण्यात आली आहेत. 

त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कुठल्याही घटनेची किंवा गुन्ह्यांची नोंद आता कागदोपत्री राहणार नाही. पोलीस ठाण्याची दैनंदिनी बरोबरच पोलीस ठाण्याचे गुन्हेविषयक कामकाज देखील पेपरलेस करण्यात आले आहे. 

पाहा व्हिडिओ -