पंकजा मुंडे यांच्या 'पुन्हा संघर्ष यात्रा'चा शुभारंभ

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 15:29
पंकजा मुंडे यांच्या 'पुन्हा संघर्ष यात्रा'चा शुभारंभ

बीड : भाजपच्या युवा मोर्च्याच्या अध्यक्षा आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या " पुन्हा संघर्ष यात्रा " चा शुभारंभ आज सिंदखेड राजा इथून होत आहे. 18 सप्टेंबरपर्यंत चालणारी ही यात्रा राज्यातील 21 जिल्ह्यातून आणि 79 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे.

यात्रेचा समारोप अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी इथे होणार आहे. 1994-95 साली गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काँग्रेस सरकार विरोधात रान उठवत महाराष्ट्र ढवळून काढला होता. 1995 ला युतीची सत्ता येण्यामध्ये मुंडे यांच्या त्या संघर्ष य़ात्रेचा महत्त्वाचा वाटा होता. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या या यात्रेच्या सहाय्यानं विधानसभा निवडणुकांपूर्वी वातावरण निर्मितीचा भाजप प्रयत्न करत आहे.

मुंडे यांना मानणार वर्ग भाजपाकडे रहावा याकडेही भाजपाचे प्रयत्न असणार आहेत. राज्यात आणि खरं तर पक्षात स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. या यात्रेमुळं पंकजा मुंडे यांची नवीन राजकीय इनिंग सुरु होणार असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. अर्थात या यात्रेचा भाजपाला आणि पंकजा मुंडे यांना किती फायदा होतो हे विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 28, 2014 - 12:29
comments powered by Disqus