कल्याण रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या भाग कोसळला

कल्याण रेल्वे स्थानकांतील प्लाट फॉर्म नंबर ३ वरील जिन्याच्या सज्जा अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. 

Updated: Apr 9, 2015, 08:02 PM IST
कल्याण रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या भाग कोसळला title=

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकांतील प्लाट फॉर्म नंबर ३ वरील जिन्याच्या सज्जा अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. 

या घटनेने  या जिन्यावरील वाहतूक रेल्वे प्रशासनाला बंद करावी लागली यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दुपारी १. ०५ मिनिटांनी हि दुर्घटना घडली दोन फूट बाय पाऊन फूट एवढा जिन्याचा सज्जाचा भाग कोसळला, ही दुर्घटना दुपारच्या सुमारास घडल्याने प्रवाशांची वर्दळ कमी होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

रेल्वे प्रशासनाने त्वरित या जिन्याची दुरुस्तीचे काम  सुरु केली असले तरी अजून किमान दोन दिवस हा पूल प्रवाशांसाठी बंद रहाणार आहे. या घटनेनंतर रेल्वेचे डीआरएम अमिताभ ओझा यांनी घटना स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली, मात्र या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.