इथं होतं गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण

गतिमंद मुलांचा सांभाळ करतो असं भासवून प्रत्यक्षात गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आलाय. जामखेडमधील इंदिरा सेवाभावी संस्थेच्या मोहटादेवी मतीमंद विद्यालयात हा प्रकार घडला असून इथल्या ग्रामास्थानीच याचा पर्दाफाश केलाय. 

Updated: Sep 14, 2014, 09:54 PM IST
इथं होतं गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण title=

अहमदनगर: गतिमंद मुलांचा सांभाळ करतो असं भासवून प्रत्यक्षात गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आलाय. जामखेडमधील इंदिरा सेवाभावी संस्थेच्या मोहटादेवी मतीमंद विद्यालयात हा प्रकार घडला असून इथल्या ग्रामास्थानीच याचा पर्दाफाश केलाय. 

जामखेड तालुक्यातलं इंदिरा सेवाभावी संस्थेच्या मोहटादेवी गतिमंद विद्यालयात ३२ विद्यार्थी आहेत. विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. मात्र या विद्यार्थ्यांना पाईप आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली जाते. इतकंच नाही तर मुलं आजारी पडली तर त्यांना दवाखान्यात न नेता विद्यालयातीलच खोलीत ठेवलं जातं. राहायला स्वच्छ जागा नाही तर खायला चांगले अन्न नाही. अक्षरशः पाण्यात शिजवलेली डाळ आणि भाकरी सारख्या जाड जाड पोळ्या या मुलांना खायला देतात. पिण्याच्या पाण्याची अवस्था तर न विचारलेलीच बरी... गतीमंद मुलांवर होत असलेला हा अमानूष अत्याचार उघडकीस आणून दिली तो जामखेडच्या ग्रामस्थांनीच...

या बाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांकडे विचारणा केली असता त्यांनी ग्रामस्थांना उर्मट शब्दांत उत्तर दिली. अखेर ग्रामस्थांनी शाळेवर धडक मोर्चा नेला आणि जामखेडचे सरपंच आणि तहसिलदार यांना तातडीनं या विद्यालयावर बोलावण्यात आलं. विद्यालयातील प्रकार पाहून तहसिलदारांनी सर्व घटनांची कबुली देत तातडीनं कारवाईचे आदेश देणाचे आश्वासन दिले. 

या संस्थेची स्थापना गतिमंद मुलांचा सांभाळ करण्यासाठी करण्यात आलीये की शासनाचं अनुदान लाटण्यासाठी असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.