सामान्य सोडाच इथं महापालिका आयुक्तांचा मोबाईल चोरीला

चोरांच्या लेखी कोण मोठा कोण लहान नसतं. जिथं सावज मिळेल ते टिपायचं हेच त्यांचं काम. म्हणूनच की काय महापालिकेच्या कामांची पाहणी करायला गेलेल्या आयुक्तांनाही चोरांनी समानतेचा संदेश दिला. 

Updated: May 4, 2015, 11:23 PM IST
सामान्य सोडाच इथं महापालिका आयुक्तांचा मोबाईल चोरीला title=

पिंपरी-चिंचवड: चोरांच्या लेखी कोण मोठा कोण लहान नसतं. जिथं सावज मिळेल ते टिपायचं हेच त्यांचं काम. म्हणूनच की काय महापालिकेच्या कामांची पाहणी करायला गेलेल्या आयुक्तांनाही चोरांनी समानतेचा संदेश दिला. 

चोरांनी राजीव जाधव यांचा APPLE कंपनीचा ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. त्याची वाकड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण या प्रकारानंतर आयुक्त आणि पोलीस दोघेही बोलायला तयार नाहीत. पण शहरातले नागरिक मात्र या घटनेनं चांगलेच हादारलेत. 

आता आयुक्तांचा मोबाईल म्हणून पोलीस तो युद्धपातळीवर शोधतीलही. पण सर्वसामान्यांच काय.. हा प्रश्न आहेच… 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.