भूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याने नागपुरात एकाची आत्महत्या

येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या राजेस कुकास नावाच्या ४२ वर्षांच्या कुटुंब प्रमुखाने विषप्राशन करून आत्महत्या केलीय. आमची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. 

Updated: Jul 4, 2015, 10:22 AM IST
भूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याने नागपुरात एकाची आत्महत्या title=

नागपूर : येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या राजेस कुकास नावाच्या ४२ वर्षांच्या कुटुंब प्रमुखाने विषप्राशन करून आत्महत्या केलीय. आमची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. 

राजेशने पाच वर्षांपूर्वी बुटीबोरी इथे प्लॉट घेतला होता. त्याची निम्मी रक्कम भीमराव बांगडे नावाच्या भूखंड व्यावसायिकाला दिली. पण त्यानंतर जमीन हस्तांतरीत करण्याच्या पुढील प्रक्रियेस तो टाळाटाळ करत होता. गुंतवलेले पैसेही परत केले जात नव्हते. अनेकदा विनवण्या करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर राजेश कुकासने बांगडेच्या घरासमोर आत्महत्या केली. 

बांग़डेने याआधी आपल्या वडिलांनाही असंच फसवंल असल्याचा राजेशच्या पत्नीचा आरोप आहे. राजेश कुकासने आपल्या सुसाईड नोटमध्येही भीमराव बांगडेच नाव लिहीलंय. या प्रकरणात संबंधित व्यावसायिकावर कारवाई व्हावी तसंच जमीन परत मिळावी, अशी मागणी केलीय. दरम्यान पोलिसांनी बांगडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओ पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.