औरंगबादेत पोलिसाचे काळे कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर मगन कोळी याने इयत्ता आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हवालदार कोळीवर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे..

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2017, 09:43 AM IST
औरंगबादेत पोलिसाचे काळे कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

औरंगबाद : खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर मगन कोळी याने इयत्ता आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हवालदार कोळीवर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे..

या पोलिसाची पत्नी आणि मुलगा गावी गेले आहेत. घरी कोणी नसल्याने त्यानं बुधवारी रात्री आपल्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही कोळीनं पीडित मुलीला दिली. 

रात्र झाली तरी मुलगी घरी का आली नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी नातेवाइकांच्या घरी तसेच परिसरात शोध सुरू केला. मात्र मुलगी सापडली नसल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ते ठाण्यातून घरी पोहोचेपर्यंत मुलगी घरी आली होती. तिला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. 

सुधाकर कोळी हा मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो खुलताबाद ठाण्यात चार वर्षांपासून कार्यरत आहे. तो लहानी आळी येथे भाड्याच्या खोलीत राहतो. बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गुरुवारी सकाळी तो ठाण्यात ड्यूटीवर हजर होता. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून कोळीविरोधात बाललैंगिक शोषण कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आली. त्यानंतर कोळीला अटक केली.