विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी प्राध्यापकाला बदडले, १२ जण अटकेत

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, April 20, 2017 - 20:43
विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी प्राध्यापकाला बदडले, १२ जण अटकेत

नागपूर : विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला बदडणाऱ्या खाजगी संस्थेच्या अध्यक्षासह १२ जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली... 

परीक्षेचा पेपर सुरु असताना विद्यार्थिनीने मोबाईलजवळ बाळगल्यावरून धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेजातील  प्राध्यापक अमित गणवीर याने विद्यार्थिनीचं हॉल तिकीट जप्त केलं होतं. 

हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली होती. या कारणावरून युवा क्रांती मंच या खाजगी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजात घुसून प्राध्यापकच्या तोंडाला काळे फासून मारहाण केली. 

या प्रकरणी प्राध्यापकाला अंबाझरी पोलिसांनी बुधवारीच अटक केली तर आज प्राध्यापकाला मारहाण करणारे पंजू तोतवाणी यांच्यासह १२ जणांविरुद्ध मारहाण,धमकी देणे इत्यादी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.

First Published: Thursday, April 20, 2017 - 20:43
comments powered by Disqus