पुण्यात घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं जोडप्याचा मृत्यू

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं एका जोडप्याला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यातील यमुनानगर इथली ही घटना आहे.

Updated: Nov 1, 2015, 01:45 PM IST
पुण्यात घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं जोडप्याचा मृत्यू title=

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं एका जोडप्याला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यातील यमुनानगर इथली ही घटना आहे.

धवल शंकर लगाडिया आणि मंदिरा रामलाल चौधरी या प्रेमी युगुलाचा घरात श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला. काल लगाडिया यांच्या घरात पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. संध्याकाळी धवल आपल्या मैत्रिणीला घरी घेऊन आला. दोघं घरात एकटेच होते. 

आणखी वाचा - ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

त्या दोघांनाही घरात आल्यानंतर काही वेळातच पेस्ट कंट्रोलचा त्रास होऊ लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. पण दुर्दैवानं काल रात्री उपचारादरम्यानच धवलचा आणि आज सकाळी मंदिराचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जातेय. 

निगडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात तपास करीत आहेत.

या घटनेमुळं आपण आपल्या घरात पेस्ट कंट्रोल करतांना काळजी घ्यावी हेच दिसून येतंय. 

आणखी वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, गुंडांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.