पुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित

पुणे स्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) शनिवारी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केलीय. 

Updated: Jul 12, 2014, 02:08 PM IST
पुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित title=

पुणे : पुणे स्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) शनिवारी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केलीय. या फुटेजमध्ये का संशयिताला पाहण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशवादी स्फोटाचा एक प्रयत्न होता.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पराशखाना पोलीस स्टेशन पार्किंगजवळ झालेल्या स्फोटाच्या अगोदर एक व्यक्ती बाईक पार्क करताना सीसीटीव्हीमध्ये आढळलाय. या व्यक्तीनं स्फोटाअगोदर 15 मिनिटांपूर्वी बाईक इथं पार्क केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी संशयिताच्या बोलण्यात कराचीचाही उल्लेख आला.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसनं पाकिस्तानच्या कराचीहून चॅट इंटरसेप्ट केलं. यामध्ये, इंडियन मुजाहिद्दीननं पोलिसांनाच निशाणा बनवण्याचा उल्लेख केल्याचं आढळलंय. या सर्व गोष्टी दहशतवाद्यांनी इंटरनेट चॅटवरून केल्याचंही आढळलंय. हे निर्देश आयएमच्या स्लीपर सेलला मिळाले. चॅटमध्ये महाराष्ट्र पोलिसांना निशाना बनवण्याचा कट रचला जात होता. 

महत्त्वाचं म्हणजे, आत्तापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. या स्फोटामागे दहशवाद्यांचा हात असल्याची शक्यता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बोलून दाखवली होती. 
पुण्याच्या फारसखाना पोलीस स्टेशनच्या समोर उभ्या केलेल्या एका बाईकमध्ये लावण्यात आलेल्या ‘आयईडी’च्या साहाय्यानं हा स्फोट घडवून आणण्यात आला. या घटनेत पाच जण जखमी झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.