पुण्यात बंगल्याला आग, महिलेचा मृत्यू

पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीतील बंगल्याला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मात्र या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली.

Updated: Dec 22, 2014, 10:59 AM IST
पुण्यात बंगल्याला आग, महिलेचा मृत्यू title=

पुणे : पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीतील बंगल्याला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मात्र या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले होते.अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यातआणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. तर दोघींना वाचविण्यात यश आले आहे.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.