पुणे जळीत कांड : ४५ तासांपासून शोध शून्य

पुणे जळीत कांडाला ४५ तास उलटले तरी अजूनही हे जळीतकांड घडवून आणणाला माथेफिरू मिळालेला नाही. पुणे पोलीस या माथेफिरूसमोर हतबल आहे की काय असा सवाल पुणेकर विचारत आहेत. 

Updated: Jun 30, 2015, 03:44 PM IST
पुणे जळीत कांड : ४५ तासांपासून शोध शून्य title=

पुणे : पुणे जळीत कांडाला ४५ तास उलटले तरी अजूनही हे जळीतकांड घडवून आणणाला माथेफिरू मिळालेला नाही. पुणे पोलीस या माथेफिरूसमोर हतबल आहे की काय असा सवाल पुणेकर विचारत आहेत. 

दरम्यान, पुण्यातील सिंहगड रोड जळीतकांडातील आरोपीचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलीय. एका माथेफिरूने परवा रात्री लावलेल्या आगीत सुमारे ८४ दुचाकी आणि ६ चारचाकी गाड्या भस्मसात झाल्या आहेत. 

गृहराज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या जळीतग्रस्तांची आज भेट घेतली. दरम्यान या घटनेतल्या संशयिताचं सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रेखाचित्र तयार करण्यात आलंय त्याआधारे तपास सुरू झालाय. 

अजून आरोपी मिळाला नसला तरी त्याचे धागेदोरे मिळाल्याची माहिती राज्यमंत्री कांबळे यांनी दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.