पुण्याचे उपमहापौर कांबळे यांचे निधन

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने झाले निधन.

Updated: May 16, 2017, 10:17 AM IST
पुण्याचे उपमहापौर कांबळे यांचे निधन title=
सौजन्य : PMC Care‏ twitter Page

पुणे : उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने झाले निधन.

घराजवळ कांबळे हे मॉर्निंगवॉक करताना त्यांना ह्दयविकारााचा आला. त्यांना तात्काळ  रुबी रग्णालयात उपचार दाखल करण्यात आले. 

निधनाचे वृत्त समजताच रुबी रुग्णालयाबाहेर रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे.

नवनाथ कांबळे हे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

१९९७ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. २००२ मध्येही त्यांनी नगरसेवकपद भुषवले. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.