पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची वाहतूक खोळंबली

पुण्यातून मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे आपण जर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघत असाल, तर तासाभरासाठी किंवा वाहतुकीचं अपडेट घेऊन रस्त्यावर वाहन आणावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

Updated: Jul 21, 2014, 10:08 AM IST
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची वाहतूक खोळंबली title=

पुणे : पुण्यातून मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे आपण जर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघत असाल, तर तासाभरानंतर किंवा वाहतुकीचं अपडेट घेऊन रस्त्यावर वाहन आणावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

सध्या ही वाहतूक जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. ही वाहतूक खोपोली मार्गे होत आहे. रात्री ऑईल टँकरला अपघात झाला, आणि हे ऑईल एक्स्प्रेस वेवर 3 ते 4 किलोमीटर पसरलं. 

हे ऑईल साफ करण्यासाठी वेळ लागणार आहे. यातच मुसळधार पाऊसही सुरू आहे. ऑईल साफ केल्यानंतरही लहान वाहन हळू चालवण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.