दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून काढायला लावल्या उठाबशा

दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून कामगारांना भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार भोसरीमध्ये घडला आहे.

Updated: Aug 20, 2016, 02:13 PM IST
दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून काढायला लावल्या उठाबशा title=

पिंपरी : दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून कामगारांना भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार भोसरीमध्ये घडला आहे. तीनही कामगार हे एका बेकरीत काम करतात, त्यांच्याकडे दहीहंडीची वर्गणी मागायला आलेल्यांना वर्गणी द्यायला नकार दिल्याने या तीन कामगारांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्या. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.