रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी

सावित्री आणि गांधारी या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड़ शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सुकट गल्ली, गांधारी नाका, दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोई घाट परीसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, महाडनगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Updated: Jun 24, 2015, 05:44 PM IST
रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी title=

अलिबाग : सावित्री आणि गांधारी या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड़ शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सुकट गल्ली, गांधारी नाका, दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोई घाट परीसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, महाडनगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काल दिवसभराच्या पावसामुळे रात्री उशिरा महाड परीसरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. महाड शहरात बाजारपेठ, क्रांतीस्तंभ, दस्तुरी नाका, भोई घाट याठिकाणी दोन ते चार फूट पाणी साचल्याने पुराची भिती वाढत होती. महाड नगरपालिकेने धोक्याचा इशाराही दिला होता. त्याचवेळी नाते गावाचा संपर्कही तुटला होता. 

दरम्यान, आज पहाटे पूर्वीच सावित्री आणि गांधारी नदीची पातळी कमी होत गेली आणि पुराच्या भीतीची छायाही ओसरली. मात्र पाऊस अधूनमधून सुरुच आहे. रायगड जिल्यात इतरत्र वादळी वाऱ्यामुळे नागोठणे, अलिबाग, पेण, मुरूड याठिकाणी झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. आता रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.