खाजगी आश्रमशाळेत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

रायगड जिल्ह्यातील रसायनीमध्ये एका खाजगी वसतीगृहात ४ अल्पवयीन मुलींवर अज्ञात व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस दाखल करण्यात आलीय. 

Updated: Jun 11, 2015, 08:43 PM IST
खाजगी आश्रमशाळेत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार title=

रसायनी, रायगड: रायगड जिल्ह्यातील रसायनीमध्ये एका खाजगी वसतीगृहात ४ अल्पवयीन मुलींवर अज्ञात व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस दाखल करण्यात आलीय. 

रसायनीतल्या चाम्भार्लीत २००४ पासून शांती आश्रमशाळा चालवण्यात येते.  या आश्रमशाळेच्या तीन मजली इमारतीच्या वस्तीगृहात सुमारे १८ मुले आणि मुली राहतात. दरम्यान, या वस्तीगृहातील ४ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झालं असल्याची तक्रार करण्यात आलीय. इतर ७ मुलींना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

यासंबंधी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. यासंबंधी आश्रमचालक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.