पुढच्या २४ तासांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता

सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. 

Updated: Apr 30, 2017, 06:42 PM IST
पुढच्या २४ तासांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता  title=

मुंबई : सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.

दोन दिवस आधीच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्याचा फटका पिकांना बसलाय. द्राक्षबागा आणि आंब्याचं नुकसान झालंय. आता पुन्हा अवकाळी पाऊस झाला तर शेतकर्यासमोर मोठे संकट असणार आहे. तुर खरेदी केंद्रावरील तुर भिजण्याचाही धोका असल्यानं शेतकरी वर्ग धास्तावलाय.