उल्हासनगर येथे स्टॉल उभारण्याच्या वादातून हाणामारी

इथे चायनीज स्टॉल उभारण्याच्या वादातून नगरसेवकाच्या नातेवाईकांनी नगरसेवक आणि त्याच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा हाणामारीचा प्रकार cctv कॅमेरात कैद झाला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2017, 10:59 PM IST
उल्हासनगर येथे स्टॉल उभारण्याच्या वादातून हाणामारी title=

उल्हासनगर : इथे चायनीज स्टॉल उभारण्याच्या वादातून नगरसेवकाच्या नातेवाईकांनी नगरसेवक आणि त्याच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा हाणामारीचा प्रकार cctv कॅमेरात कैद झाला आहे. 

राष्ट्रवादीचे नगरसेवक मीनासिंह लबाना यांनी मच्छी मार्केट परिसरात एक चायनीज स्टॉल सुरु केला होता. हा स्टॉल लावण्यास त्यांचे नातेवाईक दिलीप बहादूरसिंग लबाना आणि त्यांच्या भावांचा विरोध होता. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि नंतर या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.

दिलीप बहादूसिंग लबाना आणि इतर ६ जणांनी मीनासिंग लबाना आणि त्यांचा भाऊ सुनीलसिंग लबाना यांना लाकडी दांडके, सळई आणि लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी दिलीप आणि इतर ६ जणांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.