कोपर्डी प्रकरण, ऱाज ठाकरे पीडित कुटुंबाच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डी येथे पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबाच सांत्वन करुन ठाकरे यांनी तेथील ग्रामस्थांशीही चर्चा केली. 

Updated: Jul 25, 2016, 02:08 PM IST
कोपर्डी प्रकरण, ऱाज ठाकरे पीडित कुटुंबाच्या भेटीला title=

कोपर्डी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डी येथे पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबाच सांत्वन करुन ठाकरे यांनी तेथील ग्रामस्थांशीही चर्चा केली. 

कोपर्डीतील ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना असून अशा घटनांसाठी शरियासारखे कायदे भारतात केले पाहिजेत असं राज यावेळी म्हणाले. 

त्यासोबतच या घटनेच्या तपासाचा पाठपुरावा करणार असून कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी ग्रामस्थांनी अॅट्रॉसिटी कायद्याला पर्याय आणला पाहिजे तसेच जर अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर असे कायदे रद्द केले पाहिजे असेही राज ठाकरे यांनी सांगितले.