'पराभवातून खूप शिकलो' - राज ठाकरे

"वाटतंय ना, जमिनीवर आलो", असं राज ठाकरेंनी म्हटलं आणि एवढ्यावरच न थांबता, राज ठाकरे पुढे म्हणाले, "पराभवातून खूप शिकलो. जे झालं ते मी सोडून दिले. चिखल किती चिवडायचा! जी काही मीमांसा केली, त्यातून जो बोध घेतला तो 'बोध' बोलण्याचा नव्हे, तर कृतीचा विषय आहे. त्यानुसार कृती सुरू केली आहे". अशी मनमोकळी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये दिली.

Updated: Nov 30, 2014, 07:04 PM IST
'पराभवातून खूप शिकलो' - राज ठाकरे title=

नाशिक : "वाटतंय ना, जमिनीवर आलो", असं राज ठाकरेंनी म्हटलं आणि एवढ्यावरच न थांबता, राज ठाकरे पुढे म्हणाले, "पराभवातून खूप शिकलो. जे झालं ते मी सोडून दिले. चिखल किती चिवडायचा! जी काही मीमांसा केली, त्यातून जो बोध घेतला तो 'बोध' बोलण्याचा नव्हे, तर कृतीचा विषय आहे. त्यानुसार कृती सुरू केली आहे". अशी मनमोकळी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये दिली.

चांगले इंग्रजी शिकविण्याची सोय झाल्यास, मराठी शाळेची स्थिती सुधारेल. चांगले इंग्रजी शिकविण्याची सोय करणे हा मराठी शाळा टिकविण्यासाठी उपाय आहे. बाकी शाळांमध्ये "इंटरनॅशनल म्हणजे काय हे काही मला अजून कळालेले नाही. माझ्या मते, मराठी शाळेतच चांगले इंग्रजी शिकविले जावे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कुंभमेळा हा महापालिकेपुढील प्राधान्याचा विषय आहे. त्यासाठी निधीचा प्रश्‍न आहे. कुंभमेळा हा देशाचा विषय असेल तर एकट्या नाशिक महापालिकेवर बोजा आणणे योग्य नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. 

टोलवसुलीत पारदर्शकता यावी म्हणून रोखीने वसुली होऊ नये. रोख व्यवहारांना आळा आणला गेल्यास त्यात पारदर्शकता येईल.मनसेच्या आंदोलनामुळे राज्यात 44 टोल नाके बंद झाल्याचा दावा करीत, राज म्हणाले की, कमी किमतीच्या पुलांना टोल नसावेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.