पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडलाय. इथं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. 

Updated: Mar 30, 2016, 10:09 PM IST
पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं  title=

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडलाय. इथं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. 

आरोपी इथंच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित मुलीच्या दीड वर्षाच्या भावावर वार केलेच पण त्याचं लिंगही कापून फरार झालेत.

बोईसर दांडीपाडा मध्ये आज पहाटेच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला असून दोन्ही मुलं गंभीर जखमी आहेत. त्यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका विशेष पथकाद्वारे आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. 

या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त तर होतेच आहे पण संतापही व्यक्त केला जातोय.