खाडी आणि किनाऱ्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात

सध्या मासेमारीचा मुख्य हंगाम बंद आहे. पण खाडी आणि किनाऱ्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात झालीय. किनारपट्टी छोट्या मच्छिमारांनी भरलेली पाहायला मिळेल. 

Updated: Jul 2, 2015, 11:29 AM IST
 खाडी आणि किनाऱ्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात  title=

रत्नागिरी : सध्या मासेमारीचा मुख्य हंगाम बंद आहे. पण खाडी आणि किनाऱ्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात झालीय. किनारपट्टी छोट्या मच्छिमारांनी भरलेली पाहायला मिळेल. 

खोल समुद्रातली मासेमारी बंद असल्यामुळे मच्छिमारांना सध्या किनारपट्टीवर होणारी छोट्या माशांची मासेमारी उदरर्निवाहाचं मुख्य साधन ठरतं. मच्छिमा-यांना किनाऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण बोयर माशांसारखे अनेक मासे गळाला लागतायत. 

किनाऱ्यावर पकडलेले हे मासे किनाऱ्यावरच्या वाळूतच साफ केले जातात आणि सर्व मासे एकत्र करून आसपासच्या बाजारात विकले जातात. छोट्या जाळ्यांच्या सहाय्यानं खाडी किनारीही झिल्याच्या सहाय्यानं कुर्ल्या पकडले जातात. 

एक माणूस साधारणपणे ५० ते ६० कुर्ल्या मासे पकडतो. त्यातून त्याला दिवसाला हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळतं. पावसाळ्यात ताऊज, पालू, बोयर, रेणव्या आणि कुर्ल्या हे खास चवीचे मासे खाण्यासाठी अनेकजण कोकण किनाऱ्यावर येतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.