रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू

अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.

Updated: Mar 27, 2015, 09:38 AM IST
रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू title=

रत्नागिरी : अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.

अवकाळी पावसाने गुरूवारी संध्याकाळी पुन्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, गुहागरमध्ये पडलेल्या पावसामुळे रस्ते आणि शेतात पाणी साचले होते. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन, बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता बागायतदार करू लागले आहेत.  तर चिपळूण शहरातील मापारी मोहल्ला येथे अवकाळी पावसामुळे वीजेची तार तुटून नववीतील विद्यार्थीनीवर पडल्याने, शॉक लागून तिचा मृत्यू झाला. शाईन फाईक असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. तसंच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या काका आणि काकू यांनाही शॉक लागला असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारांनी झोडपल्यानं नाशिक जिल्ह्यातील सात हजार कोटींची द्राक्षं भुईसपाट झालीयेत. तर निम्म्याहून अधिक फटका निर्यातक्षम द्राक्षांनाही त्याचा फटका बसलाय. त्यामुळं यंदा द्राक्ष निर्यात घटणार असून राज्याला मिळणा-या कोट्यवधी डॉलर्सच्या परकीय चलनास मुकावं लागणाराय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.