साईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईंचरणी कोट्यवधींचं दान केलंय. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या आठ दिवसांत साईबाबा चरणी  तब्बल ११ कोटी ५० लाखांचं रेकॉर्डतोड दान जमा झालंय.

Updated: Jan 2, 2015, 11:37 PM IST
साईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई! title=

शिर्डी : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईंचरणी कोट्यवधींचं दान केलंय. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या आठ दिवसांत साईबाबा चरणी  तब्बल ११ कोटी ५० लाखांचं रेकॉर्डतोड दान जमा झालंय.

या दानामध्ये ६ कोटी ९० लाखांची देणगी काऊंटर चेक डीडी आणि ऑनलाईनद्वारे रक्कम जमा झालीय. दानामध्ये ३ कोटी ८० लाखांचं सोनं,  १६ किलो चांदीचा समावेश आहे. तसंच ४० देशांतूल विदेशी चलन प्राप्त झालंय. रोख दानामध्ये मात्र विदेशी चलनाचा समावेश नाही.

१ जानेवारीला देणगी काऊंटरवर एक कोटींची रक्कम जमा झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत दानामध्ये २५ लाखांची वाढ झालीय. साईबाबा संस्थानकडे आजमितीला १३१८ कोटींच्या ठेवी तर ३६६ किलो सोनं आणि ३८२६ किलोग्रॅम चांदी असून तब्बल ७ कोटी ७० लाखांचे हिरे आहेत.  

एव्हढी श्रीमंती असूनही भक्तांना साई संस्थान आणि सरकार मुलभूत गरजा, सुलभ दर्शन, सुरक्षा, पार्किंगची सुविधा पुरवू शकत नाहीय.संस्थानच्या शेकडो योजनांच्या घोषणा हवेतच विरल्यायत तर काही लालफितीत अडकल्यायत. महत्त्वाचं म्हणजे, साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून सगळा खर्च पार पडल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम येत्या पाच वर्षात खर्च न केली गेल्यास साईसंस्थानला आयकर भरावा लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.