दिवसाढवळ्या होणार ९७ झाडांची कत्तल?

तळेगावमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तब्बल ९७ झाडांची कत्तल केली जाणार आहे. याचाच विरोध करण्यासाठी तळेगावकर रस्त्यावर उतरलेत. मूक मोर्चा काढत तळेगावकरांनी या कत्तलीला विरोध केलाय. 

Updated: May 2, 2015, 09:27 PM IST
दिवसाढवळ्या होणार ९७ झाडांची कत्तल? title=

तळेगाव : तळेगावमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तब्बल ९७ झाडांची कत्तल केली जाणार आहे. याचाच विरोध करण्यासाठी तळेगावकर रस्त्यावर उतरलेत. मूक मोर्चा काढत तळेगावकरांनी या कत्तलीला विरोध केलाय. 

उन्हाच्या प्रचंड झळांपासून गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून तळेगावकरांचं रक्षण करणाऱ्या आमराईतील ९७ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. रस्ता रुंदीकरणारासाठी ही झाड तोडण्याची परवानगी नगरपरिषदेनं मागितलीय. झाडं तोडण्यासाठी प्रशासनानं हरकतीही मागवल्या आहेत. प्रत्येक झाडावर नगरपरिषदेनं तशा नोटीस लावल्या आहेत. पण ही झाड तोडली जाऊ नयेत म्हणून तळेगावकर रस्त्यावर उतरले. 

तळेगावकरांचा हा विरोध पाहून नगरपरिषद थोडी नमती भूमिका घेतलीय. नागरिकांचा विरोध असेल तर झाडं तोडणार नाही, असं नगराध्यक्ष सुलोचना आवारे यांनी स्पष्ट केलंय.

सध्या तरी नगरपरिषदनं एक पाऊल मागे घेतलंय. मात्र 'किती दिवस?' हा मात्र प्रश्न कायम आहे! 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.