रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.

Updated: Jun 22, 2016, 11:00 AM IST
रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी  title=

मुंबई : ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.

चालू वर्षी शैक्षणिक वर्षांत रिंकू ही दहावीच्या वर्गात गेली आहे. परंतु शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी ती शाळेत गेली नव्हती. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने तिला खडे बोल सुनावले होते. अखेर मंगळवारी ‘आर्ची’ अकलूजमध्ये आपल्या शाळेत हजर झाली. 

रिंकू राजगुरू ही सैराट सिनेमात काम करण्यापूर्वी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखीच एक विद्यार्थिनी होती. ‘सैराट’ सिनेमा रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर ती प्रसिध्दीच्या झोतात आली. त्यामुळे तिची दिनचर्या पार बदलून गेली आहे. तिला नेहमी संरक्षणात बाहेर पडावे लागत आहे.

१२ जून रोजी रिंकू राजगुरू ही आपल्या स्वत:च्या अकलूजमध्ये सन्मान स्वीकारण्यासाठी आली, त्या वेळी अवघ्या अकलूजकरांनी तोबा गर्दी केली. तिला मोटारीतून उतरणेदेखील कष्ठीण झाले होते. 

रिंकू राजगुरू ही अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जिजामाता विद्यालयात शिक्षण घेत आहे. दरम्यान, मंगळवारी अखेर रिंकू राजगुरू ही गणवेशासह शाळेत हजर झाली, तेव्हा शाळेत वेगळाच माहोल तयार झाले. तिला भेटण्यासाठी तिच्या वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांनीही गर्दी केली होती.