काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2017, 11:23 AM IST
काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात title=

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय. काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन  करत रितेशने शहरात रोड शो केला. रितेश देशमुख हे काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचे धाकटे बंधू आहेत. शिवाजी चौकातून सुरु झालेला हा रोड शो लातूर शहरातील जुन्या गाव भागात गेला होता.

 रितेशच्या या रोड शोला लातूरकरांनी विशेषतः तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी तरुणांचे जथ्ये रितेशला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळविण्याची धडपड करीत होते. यावेळी रितेशसोबत मोठे बंधू अमित देशमुख आणि महापालिकेत काँग्रेसचे उमेदवार, स्थानिक नेते उपस्थित होते. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर महापालिका निवडणुकीत फटका बसू नये म्हणून अमित देशमुख सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.