कल्याणात मुलाच्या गळ्यावर वार करत लुटली रोकड

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. निर्दयपणे मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील ५ हजाराची रोकड़ घेवून चोरट्याने पळ काढला.

Updated: May 1, 2015, 04:47 PM IST
कल्याणात मुलाच्या गळ्यावर वार करत लुटली रोकड  title=

ठाणे : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. निर्दयपणे मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील ५ हजाराची रोकड़ घेवून चोरट्याने पळ काढला.

कल्याण पूर्वेकडील मलंगरोड़ वरील बालाजी पेरेडाईज या इमारतीत एक लहान मुलगा एकटाच घरी असल्याची संधी साधत कुटुंबाच्या परिचयतील एक व्यक्तिने  घरात प्रवेश केला. अत्यंत निर्दयपणे या मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील  पाच हजार रुपयांची रोकड़ घेवून तेथून पळ काढला. या घटनेत  मुलगा गंभीर जख़मी झाला असून त्याला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे  सुभाष यादब हे आरोपीचे नाव असून तो पसार झाला आहे. कल्याण पूर्वेकडील मलंग रोडवरील नांदिवली गाव परिसरात बालाजी परेडाइस इमारत आहे. या इमारतीत जितेंद्र नुकूलवार आपली पत्नी आणि ३ मुलांसोबत राहतात. सकाळी जितेंद्र नुकूलवार आणि त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे कामावर गेले तर त्यांचा १२ वर्षांचा मुलगा मंदार नुकूलवार घरात एकटा होता. तर त्यांची दोन मुले ट्युशनला गेली. दुपारच्या सुमारास सुभाष यादव बहाणा करत घरात घुसला मंदार घरी एकटा असल्याची संधी साधत त्याने मंदारच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. 

तसेच मंदारचा आवाज बाहेर जावू नये  म्हणून त्याने घरातील टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला होता. या मारहाणीत मंदार जखमी झाल्याने तो बेशुद्ध पड़ला. सुभाष यादव याचा मंदार मृत समज झाल्याने सुभाषने घरतील दागिने तसेच ५ हजार रुपयांची रोकड़ घेवून पसार झाला. सायंकाळी ६ वाजता मंदारची आई घरी आल्यावर मंदारची अवस्था पाहून घाबरून गेली. मंदारला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद दाखल केलाय.यादव असून  फरार आहे. यादवला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून तपास करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.