नववीच्या स्वानंदचा 'रोबोटीक शेती'चा प्रयोग!

बारा महिने शेतीत राबराब राबणाऱ्या बळीराजाचा ताण थोडा फार कमी करण्याचा प्रयत्न एका शाळकरी मुलानं केलाय. बीडच्या संस्कार विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणाऱ्या स्वानंद अपसिंगेकर या विद्यार्थ्यानं... 

Updated: Dec 19, 2015, 07:56 PM IST
नववीच्या स्वानंदचा 'रोबोटीक शेती'चा प्रयोग! title=

बीड : बारा महिने शेतीत राबराब राबणाऱ्या बळीराजाचा ताण थोडा फार कमी करण्याचा प्रयत्न एका शाळकरी मुलानं केलाय. बीडच्या संस्कार विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणाऱ्या स्वानंद अपसिंगेकर या विद्यार्थ्यानं... 

कृषी प्रधान भारत देशात बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेती हा आतबट्याचा व्यवहार झालाय. शेती करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं अस म्हटलं जातंय,कारण शेती शाश्वत राहिलेली नाही,त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत,गावाकडील जमीन विकून शहराकडे धाव घेण्याचा कल वाढतो आहे. बारा महिने अठरा काळ शेतीत राबल्यानंतरही पदरी काहीच पडत नाही. हीच शेतकऱ्यांची अवस्था पाहून बीड मधील संस्कार विद्यालयात नववीत शिकणाऱ्या स्वानंद अपसिंगेकर या विद्यार्थ्यानं पेरणी पासून कापणीपर्यंत सर्व काही करणार यंत्र तयार केलंय. 

रोबोटमध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान, डीसी मोटार, फायबरच्या पट्या, खेळण्यातील गाडीची चाक, छोटा पंखा, वापरून स्वानंदनं हे यंत्र तयार केलं आहे. पूर्णपणे डीसी करंटवर चालणाऱ्या या यंत्रामुळे शेतकऱ्याला पेरणीसाठी बैल, नांगर किंवा इतर वस्तू लागणार नाहीत.

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात या वर्षी आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान हा विषय असल्याने आम्ही हा प्रयोग केला. स्वानंदनं त्याचा इंजिनियर भाऊ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे यंत्र बनवलंय. 

वेगळं काही तरी करण्याचा त्याचा लहानपणा पासूनचा स्वभाव आहे. हा प्रयोग करताना त्याला काही अडचणी आल्या मात्र त्याने त्या दूर केल्या असं स्वानंदची बहीण तिलोत्तमा सांगते. विज्ञान प्रदर्शनात दाखवण्यासाठी तयार केलेलं हे रोबोटीक मॉडेल आणखी काही वेगळे प्रयोग करून तज्ज्ञ लोकांनी त्याला पैलू पडल्यास बळीराजाचे कष्ट नक्कीच कमी होतील.