भ्रष्टाचार रोखण्यासाठी आरटीओ यंत्रणा बरखास्त करणार - गडकरी

भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाटी आरटीओ यंत्रणा बरखास्त करून नवी यंत्रणा उभारणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलेत. ते पुण्यात बोलत होते.

Updated: Aug 19, 2014, 05:32 PM IST
भ्रष्टाचार रोखण्यासाठी आरटीओ यंत्रणा बरखास्त करणार - गडकरी title=

पुणे : भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाटी आरटीओ यंत्रणा बरखास्त करून नवी यंत्रणा उभारणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलेत. ते पुण्यात बोलत होते.

आरटीओमध्ये लक्ष्मीदर्शनाशिवाय काम होत नसल्याचीही टीकाही यावेळी गडकरी यांनी केली. लवकरच देशातील आरटीओ तसेच वाहतूक पोलीस हे वाहतुक नियमनाच्या प्रक्रियेतून हद्दपार होणार आहेत. वाहतूक नियमन तसंच नियंत्रणाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यासंबंधीचा एक नवीन कायदा तयार करण्यात आला आला आहे.

संसदेच्या येत्या अधिवेशनात तो मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पुण्यात बोलताना दिली. लवकरच देशातील आरटीओ तसेच वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनाच्या प्रक्रियेतून हद्दपार होणार आहेत. वाहतूक नियमन तसंच नियंत्रणाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यासंबंधीचा एक नवीन कायदा तयार करण्यात आला आला आहे, असे गडकरी यांनी सांगितले. 

एखाद्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील 24 तासाच्या आत त्याच्या घरी दंड वसुलीसाठी पाठक पोहोचेल. आणि दंड न भरता प्रकरण कोर्टात गेल्यास, निकाल आरोपीच्या विरोधात लागला तर तिप्पट दंड वसूल केला जाणार आहे. रस्ते वाहतुकीशी संबंधित कालबाह्य झालेले कायदे रद्द करून इंग्लंड तसेच इतर सुधारित देशांतील कायद्यांच्या धर्तीवर नवीन कायदे तयार करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.