मराठा क्रांती मोर्चाला संभाजीराव भिडे गुरुजींचा पाठिंबा

राज्यभरात सध्या लोखोंचा मराठा क्रांती मोर्चा पाहायला मिळत आहे. 27 सप्टेंबरला सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार असून या मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजीं यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

Updated: Sep 22, 2016, 06:44 PM IST
मराठा क्रांती मोर्चाला संभाजीराव भिडे गुरुजींचा पाठिंबा title=

मुंबई : राज्यभरात सध्या लोखोंचा मराठा क्रांती मोर्चा पाहायला मिळत आहे. 27 सप्टेंबरला सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार असून या मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजीं यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
 
शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मराठा मोर्चा कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे गुरुजींनी मराठा समाजाचे कौतूक करत मोर्चाला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. 'मराठा मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मराठा पेटून उठालाय ही चांगली गोष्ट आहे, हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं', असं भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.