टगेगिरीविरोधात रणशिंग फुंकणार, पंकजा मुंडेंची संघर्षयात्रा सुरु

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 19:24
टगेगिरीविरोधात रणशिंग फुंकणार, पंकजा मुंडेंची संघर्षयात्रा सुरु

सिंदखेडराजा, बुलडाणा : टगेगिरीविरोधात रणशिंग फुंकणार असल्याचा एल्गार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुकारलाय.

गुरुवारी, पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेला बुलडाणा जिल्ह्यातल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा इथून सुरुवात झाली. 'टगेगिरीविरोधात रणशिंग फुंकणार' असं म्हणत पंकजा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र खरंच लोडशेडिंगमुक्त झालाय का असा सवाल पंकजा यांनी यावेळी आघाडी सरकारला विचारला. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार? असा राज्य सरकारला सवाल विचारतानाच गुन्हेगारीतही महाराष्ट्र क्रमांक एकवर असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. 

'जनतेचे आशीर्वाद देवापेक्षाही मोठे आहेत... मुंडे साहेबांचं स्वप्न सत्यात उतरणारच' असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

संघर्ष यात्रेला सुरुवात करताना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही कन्या हजर होत्या. पंकजा यांच्यासह प्रीतम आणि यशश्री या दोघीही व्यासपीठावर उपस्थित होत्या.. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, भाजप नेते पांडुरंग फुंडकर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, August 28, 2014 - 19:24
comments powered by Disqus