संजय दत्तप्रकरणी बाळासाहेबांनी दरडावले पण मुंड्यांनी तारले : उज्ज्वल निकम

अभिनेता संजय दत्त खटल्याप्रकरणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले होते. संजयला आपल्याला सोडवायचे आहे, असे सांगत त्यांनी आपल्याला दरडावले. मात्र, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी तारले, अशी श्रद्धांजली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाहिली. 

Updated: Jun 3, 2015, 05:01 PM IST
संजय दत्तप्रकरणी बाळासाहेबांनी दरडावले पण मुंड्यांनी तारले : उज्ज्वल निकम title=

मुंबई : अभिनेता संजय दत्त खटल्याप्रकरणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले होते. संजयला आपल्याला सोडवायचे आहे, असे सांगत त्यांनी आपल्याला दरडावले. मात्र, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी तारले, अशी श्रद्धांजली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाहिली. 

मी बाळासाहेब यांना नकार देताच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी माझ्याकडून बॉम्बस्फोटाचा खटला काढून घेतला, मात्र तत्कालिन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला तारले आणि आज जो काही मी आहे तो त्यांच्यामुळेच असे स्पष्टीकरण निकम यांनी दिले. 

या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला आपल्याला सोडवायचे आहे, असे बाळासाहेबांनी अधिकाराने आपल्याला सांगितले आणि मुख्यमंत्र्यांना माझे वकिलपत्र काढण्याचा व पुन्हा जळगावला धाडण्याचा आदेश दिला, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर बाळासाहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही, उलट माझं कौतुक केलं आणि आमची गट्टी जमली, अशी आठवणही त्यांनी सांगितली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त (३ जून) पुण्यातील 'चपराक' या साप्ताहिकास निकम यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत निकम यांनी संजय दत्तला वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कसा दबाव टाकला, याबाबत सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.