सहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान

साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

Updated: Aug 19, 2016, 11:40 AM IST
सहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान title=

सातारा : साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. पोळला अटक केल्यावर त्यानं पोलिसांना एक पत्र लिहीलं. 

पोलिसांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठीच हे खून केल्याचं त्यानं पत्रात लिहीलं आहे. त्यानं पत्रामध्ये ही केस सोडवल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन केलंय. 

2003 ते 2016 पर्यंतच्या काळातच तुम्ही हे करु शकत होतात, पण तुमच्यामधला भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे तुम्ही हे केलं नाहीत, असा आरोपच त्यानं पोलिसांवर केला आहे.