अन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची भावना - मुख्यमंत्री फडणवीस

विदर्भावर राज्यकर्त्यांकडून सातत्यानं अन्याय झाल्यामुळे वेगळ्या विदर्भाची भावना तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 

Updated: Dec 19, 2014, 06:33 PM IST
अन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची भावना - मुख्यमंत्री फडणवीस title=

नागपूर : विदर्भावर राज्यकर्त्यांकडून सातत्यानं अन्याय झाल्यामुळे वेगळ्या विदर्भाची भावना तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 

राज्यपालांचे निर्देश असतानाही विदर्भाला निधी दिला गेला नसल्याचं सांगत त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये दिल्या गेलेल्या निधीची यादीच सादर केली. विदर्भाला कमी आणि एका विशिष्ट भागाला जास्त निधी दिला गेल्याचं त्यांनी नमूद केलं. विदर्भात सिंचनाच्या सोयी झाल्या नसल्याचं फडणवीस म्हणाले. सरकारनं आतापर्यंत केलेल्या कामांची यादी वाचताना विदर्भासाठी घोषणांची खैरात केलीये.

सध्या सुरू असलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित झाला. विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी विदर्भ विकासाच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, गोपालदास अग्रवाल आणि भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या विदर्भाच्या घोषणांना काही आमदारांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देऊन प्रत्युत्तर दिलं.

तत्पूर्वी विदर्भाच्या चर्चेच्या सुरूवातीला विधानसभेत केवळ एकच मंत्री उपस्थित होते. तसंच विदर्भातल्या आमदारांनीही या चर्चेकडे पाठ फिरवली होती. विधानसभेत कोरम नसल्यानं १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली. त्यामुळं विदर्भाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.