पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक शोषण, तरुणीचे ठिय्या आंदोलन

अंबाझरी पोलीस स्टेशन बाहेर गेल्या दोन दिवसापासून २४ वर्षीय पीडित तरुणी ठाण मांडून बसली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2017, 07:58 AM IST
पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक शोषण, तरुणीचे ठिय्या आंदोलन title=

नागपूर : अंबाझरी पोलीस स्टेशन बाहेर गेल्या दोन दिवसापासून २४ वर्षीय पीडित तरुणी ठाण मांडून बसली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केलाय. 

सप्टेंबर २०१६ मध्ये तीनं याबात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली.. या प्रकरणात आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळाला. हे दोघेही यवतमाळचे राहणारे असून तिथेच त्यांची ओळख झाल्याचे पिडीत तरुणी सांगते. १५ एप्रिलला रस्त्यावरून जात असताना आरोपीने  जबरदस्तीने त्याचा घरी नेऊन मारहाण केली आणि आयुष्यातून निघून जाण्यास सांगितले तसे न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याची धमकी दिल्याचा पिडीत तरुणीचा आरोप आहे.

या मारहाणी विरोधात अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास आल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. ज्याविरोधात पिडीत तरुणी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे.