चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय. 

Updated: Sep 9, 2016, 06:24 PM IST
चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार title=

यवतमाळ : स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय. 

नर्सरीपासून सीनियर केजीपर्यंतचे विद्यार्थी असलेल्या ड्रीम प्ले स्कूलमध्ये हा किळसवाणा प्रकार उघडकीला आहे. ड्रीम प्ले स्कूलमध्ये वणीतील प्रतिष्ठीत नागरिकांची मुलं शिक्षण घेतात. अवघ्या तीन ते पाच वयोगटातली मुलं दररोज स्कूल बसने ये-जा करतात. 

महिन्याभरापूर्वी मुलं भयभीत झालेली पाहून पालकांनी पालक सभेत या प्रकाराला वाचाही फोडली होती. तरीही शाळा प्रशासनानं कुठलीही दखल न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळं पालकांमध्ये रोषाचं वातावरण तयार झालं. त्यामुळं पालकांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार केली.

तक्रारीनंतर वणी पोलिसांनी बसचालक बंडू उर्फ सुरेंद्र साहू, त्याचा साथीदार, त्यांना सहकार्य करणारी बसमधली महिला कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक अशा पाच जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवलाय.