शरद पवारांचं 'जय कर्नाटक'

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बेळगावातील एका खासगी कार्यक्रमात भाषण संपल्यानंतप 'जय कर्नाटक' असा नारा दिला. मात्र बेळगावात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमातील भाषणात शरद पवार यांनी जय हिंद म्हटलं पण, जय महाराष्ट्र म्हणण्यास कटाक्षाने टाळलं.

Updated: Feb 8, 2015, 11:17 PM IST
शरद पवारांचं 'जय कर्नाटक' title=

बेळगाव : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बेळगावातील एका खासगी कार्यक्रमात भाषण संपल्यानंतप 'जय कर्नाटक' असा नारा दिला. मात्र बेळगावात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमातील भाषणात शरद पवार यांनी जय हिंद म्हटलं पण, जय महाराष्ट्र म्हणण्यास कटाक्षाने टाळलं.

शरद पवार यांनी यापूर्वी बेळगावसाठी आंदोलन केली आहेत, मग शरद पवार यांना जय महाराष्ट्राचं एवढं वावडं का असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील एक जाणकार नेते म्हणून ओळखले जातात, बेळगाव प्रश्नी त्यांनी महाराष्ट्राची भूमिका पुढे नेणे अपेक्षित असतांना शरद पवारांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवण्याचा का प्रयत्न केला आहे. हा प्रश्न उपस्थित होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.