शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर

मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी  जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

Updated: Jul 11, 2016, 03:47 PM IST
शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर  title=

कोल्हापूर : मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी  जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

जोपर्यंत यापुढे शेट्टी आणि जानकर आहेत तोपर्यंत अजित पवारांना सत्ता मिळणार नाही, असाही टोला जानकर यांनी लगावला. 

जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संयुक्त सत्काराचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे करण्यात आले होते. या वेळी भरपावसात कार्यकर्त्यांनी या दोघांसह राजू शेट्टी यांची जंगी विजयी मिरवणूक काढली. 

यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी ताकद दिली तर दोन्ही संघटनांना आणखी लाल दिव्याच्या गाड्या मिळतील. शेट्टी यांच्या स्वाभिमानी दूध संघाचा आदर्श घेऊन आणि ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा कारभार करू, असा विश्वास या वेळी जानकर यांनी व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुखमैदान तोफ अशी ज्यांची ओळख आहे त्या सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजविण्यात आला.