सेनेची लढाई आघाडीशी की भाजपशी? - देवेंद्र फडणवीस

भाजपवर शिवसेना नेत्यांकडून सातत्यानं टीका होत आहे. त्याला आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. आपली खरी लढाई कोणाशी आहे. आघाडी सरकारशी की भाजपशी, याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. 

Updated: Oct 6, 2014, 12:24 PM IST
सेनेची लढाई आघाडीशी की भाजपशी? - देवेंद्र फडणवीस title=

नागपूर : भाजपवर शिवसेना नेत्यांकडून सातत्यानं टीका होत आहे. त्याला आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. आपली खरी लढाई कोणाशी आहे. आघाडी सरकारशी की भाजपशी, याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. 

विधानसभा निडणुकीच्या तोंडावर २५ वर्षांची युती भाजपने तोडली. याची घोषणा भाजपने केली. मात्र, आम्हाला अपेक्षित जागा न मिळाल्याने आम्हाला मित्र पक्षांना खूश ठेवता येणार नाही, असं सांगत भाजपने युती तोडली. युती तुटल्यानंतर शिवसेनेला एकटं पाडण्यात येत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, शिवसेनेने आक्रमकपणा घेत भाजपला हिंदुत्वच्या मुद्यावर लक्ष्य केले. त्यामुळे भाजप अधिकच अडचणीत आलाय. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर टीका केली. शिवाजी महाराज कोणाची खासगी मालमत्ता नसल्याचे म्हटले. त्यामुळे शिवसेनेने भाजपचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

२५ वर्षे खंडणी घेणाऱ्यांबरोबर कशी काय युती केलीत. आम्ही कोणाच्या नावावर खंडणी घेतलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुम्ही कधी शिवजयंती साजरी केली का, असा थेट सवाल केला. युती तुटल्यानंतर भाजप-शिवसेनेत टीका होत असल्याने भाजपच्या गोठात धास्ती निर्माण झाली आहे. यावर आपली खरी लढाई कोणाशी आहे. आघाडी सरकारशी की भाजपशी, याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे, असं फडणवीस म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.