खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा

कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. 

Updated: Dec 30, 2015, 05:27 PM IST
खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा  title=

जळगाव : कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. 

जळगाव दिवाणी न्यायालयात खडसे यांनी हा खटला दाखल केला. खडसे यावेळी स्वतः हजर होते. आमदार गुलाबराव पाटील यांनी कोणतेही पुरावे नसतांना पॉलीहाऊसच अनुदान एकाच दिवशी लाटले.  तसेच मुक्ताईनगर सूत गिरणीसाठी १६१ कोटी रुपये अनुदान घेतल्याचा आरोप केला होता.

वास्तविक सूतगिरणीसाठी फक्त २० कोटी रुपयांचे अनुदानच मिळाले असतांना पाटील यांनी बेछूट आरोप केल्याने जनमानसात आपली प्रतिमा मलीन झाल्याने आपण हा दावा दाखल केल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले.