शिवसेनेत चलबिचल, रत्नागिरीचे आमदार उदय सामंतांची दांडी

 एकविरा देवीच्या दर्शनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे एक सोडून सर्व आमदार उपस्थित होते. मात्र यावेळी उदय सामंत अनुपस्थित होते. सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र आपण मतदारसंघातल्या दौ-यामुळे अनुपस्थित असल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं आहे.

Updated: Nov 5, 2014, 08:19 AM IST
शिवसेनेत चलबिचल, रत्नागिरीचे आमदार उदय सामंतांची दांडी title=

रत्नागिरी : एकविरा देवीच्या दर्शनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे एक सोडून सर्व आमदार उपस्थित होते. मात्र यावेळी उदय सामंत अनुपस्थित होते. सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र आपण मतदारसंघातल्या दौ-यामुळे अनुपस्थित असल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले आणि नवनिर्वाचीत आमदार उदय सामंत नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे युवा पदाधिकारी आणि काही नेतमंडळी त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आमदार राजन साळवी यांचे सामंत मित्र असले तरी काही शिवसेनेचे पदाधिकारी सामंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीत असताना त्यांनी काहींना दुखावले होते. मात्र, सामंत यांनी मी विरोधी पक्षात असताना काही चुकीचे बोलले गेले असेल तर ते विसरा असे जाहीर  बोलून दाखविले होते. त्यामुळे शिवसेनेत त्यांच्याविषयी कटू असल्याचे प्रचिती आली होती. परंतु ही नाराजी दूर झालेली दिसत नाही, अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, आता ६३ आमदार दर्शनाला आणले आहेत. मात्र लवकरच १८० आमदार दर्शनाला घेऊन येणार असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ल्याच्या एकविरेच्या चरणी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात रयतेचं राज्य आणून दाखवणार असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. यामुळं मात्र भाजप सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम वाढल्याचं दिसतंय. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपदासह मंत्रिमंडळात एक तृतीअंश वाटा मागितलाय. मात्र भाजपला शिवसेनेची मागणी मान्य नाही त्यामुळं सत्तेत सहभागी होण्याबाबतचा तिढा वाढला आहे.

आता उद्धव ठाकरेंनी कार्ल्यात वक्तव्य केल्यामुळं युतीबाबत संभ्रमाची स्थिती कायम आहे. ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा देवीचं निवडणुकीनंतर दर्शन घेण्याची परंपरा शिवसेनेनं कायम ठेवलीये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विजयी ६३ आमदारांना घेऊन एकवीरा आईचं दर्शन घेतलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.