रविंद्र गायकवाड यांची पुन्हा पोलिसांशी बाचाबाची

 गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागातील एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी लातूर येथे आंदोलन केले. या आंदोलनात वादग्रस्त खासदार रविंद्र गायकवाड पोलिसांशी वाद घालण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 19, 2017, 06:42 PM IST
रविंद्र गायकवाड यांची पुन्हा पोलिसांशी बाचाबाची title=

लातूर :  गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागातील एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी लातूर येथे आंदोलन केले. या आंदोलनात वादग्रस्त खासदार रविंद्र गायकवाड पोलिसांशी वाद घालण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी कथित गैरवर्तणूक केल्याचा आरोप लावून सर्व विमान कंपन्यांनी रविंद्र गायकवाड यांच्यावर विमानातून उड्डाण बंदी केली होती.  

आता राज्यातील अनेक भागातील एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या विरोधात शिवसेनेने लातूर येथे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात खासदार रविंद्र गायकवाड यांची आणि उपस्थित पोलिसांची बाचाबाची झाली.